पुजा बोनकिले
उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते.
उन्हाळ्यात तेलकट त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे असते.
तेलकट त्वचेची काळजी घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांनी चेहरा दोन वेळा धुवावा. यासाठी दर्जेदार क्लींजर वापरावे.
उन्हाळ्यात चेहरा फ्रेश दिसण्यासाठी टोनर वापरावा.
तुमची त्वचा तेलकट असेल तर लाइट मॉइश्चराइझर वापरावे.
उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. त्वचा तेलकट असेल तर ऑइल फ्री सनस्क्रीन वापरावे.
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी आठवड्यातून दोन वेळा स्क्रब करावे.