Aarti Badade
ओलसरपणा, चिखल, बुरशी, सांडपाणी यामुळे त्वचा सडू लागते, दुर्गंधी येते आणि संसर्ग होतो.
पावसात भिजल्यावर पाय लगेच धुवा व कोरडे करा. ओलसर पाय संसर्गाचे मुख्य कारण ठरतात.
थोडं मीठ टाकून गरम पाण्याने पाय धुतल्याने बुरशी आणि दुर्गंधीपासून बचाव होतो.
ओपन टायपच्या चप्पला वापरा. बंद बूटात ओलसरपणा साठून त्वचा सडते.
पाय धुतल्यावर अँटीसेप्टिक लावल्याने संसर्ग टाळता येतो.
बुरशीपासून बचावासाठी पायांच्या बोटांमध्ये टाळक्याची पावडर किंवा अँटीफंगल पावडर लावा.
नखं वेळेवर कापा. नखांखाली घाण साचली तर बुरशी वाढते.
कोरडी व सडकी त्वचा टाळण्यासाठी रोज पायांना मॉइश्चरायझर लावावं.