पुजा बोनकिले
उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत.
अशात आरोग्यासह त्वेचेची काळजी घेणे गरजेचे आहे.
तुम्ही चेहऱ्यासह ओठांची काळजी घेतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
उन्हाळ्यात नियमितपणे पाणी प्यावे. यामुळे ओठ कोरडे पडत नाही. तसेच हायड्रेट राहतात.
ओठांना सतत जीभ लावणे टाळावे.
जर ओठ फुटलेले असतील तर बदाम तेल लावावे.
उन्हाळ्यात ओठांना लिपस्टिक लावून झोपू नका. यामुळे ओठ काळे पडतात.
ओठांवर मध-कॉफीने मसाज केल्यास काळे पडत नाही.