Monika Shinde
उन्हाळ्यात तापमानामध्ये वाढ होऊन गाडीच्या टायर्समध्ये हवा कमी होणे, टायर्स फुटणे आणि अन्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
उन्हाळ्यात गाडीला जास्त उष्णता सहन करावी लागते. त्यामुळे इंजिन ऑईल, ब्रेक आणि टायर्स चेक करा.
उन्हाळ्यात रस्ते जास्त गरम होतात, त्यामुळे टायर्समध्ये हवा कमी होऊ शकते. टायर्सची हवा योग्य आहे का, हे तपासा.
उन्हाळ्यात गाडीचे एसी खूप महत्त्वाचे ठरते. एसी व्यवस्थित चालत आहे का, ते तपासा आणि हवा साफ आहे का, हे देखील पहा.
गाडीला सावलीच्या ठिकाणी पार्क करा. उष्णतेमुळे गाडी गरम होऊ शकते, म्हणून गॅरेज किंवा झाडाखाली थोडा वेळ पार्क करा. त्यामुळे गाडी थंड होईल.
उन्हाळ्यात गाडीवर धूळ आणि माती जमा होते. यामुळे गाडीला नियमितपणे धुणे आवश्यक आहे, जेणेकरून गाडी स्वच्छ आणि चांगली दिसेल.