क्रेडिट कार्ड कसं वापरायचं असतं?नवशिक्यांसाठी सोप्या टीप्स

Pranali Kodre

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड (Credit Card) मिळालं की ते काळजीपूर्वक आणि शिस्तीने वापरावे लागते, कारण क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारे बँकेकडून मिळालेले तात्पुरते कर्ज असते.

How to Use Credit Cards?

|

Sakal

बिलिंग सायकल (Billing Cycle)

प्रत्येक महिन्याला तुम्ही क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीचे बिल तयार होण्यासाठी एक निश्चित तारीख असते, बिल तयार झाल्यानंतर साधारण १५-२० दिवसांचा कालावधी (Grace Period) ते बिल भरण्यासाठी मिळतो.

How to Use Credit Cards?

|

Sakal

कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची भिती

जर निर्धारित कालावधीत तुम्ही संपूर्ण बिल भरले, तर तु्म्हाला एकही रुपया व्याज लागत नाही, पण जर तुम्ही फक्त किमान रक्कम भरली, तर उरलेल्या रकमेव बँक खूप जास्त व्याज आणि GST आकारते.

How to Use Credit Cards?

|

Sakal

क्रेडिट कार्डचे बिल म्हणजे...

क्रेडिट कार्डचे बिल म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी क्रेडिट कार्ड वापरतो, त्याचे पैसे तात्पुरते बँक किंवा कार्ड कंपनी भरते, पण त्यानंतर आपल्याला हे पैसे बँक/कंपनीला परत करायचे असतात.

How to Use Credit Cards?

|

Sakal

अतिरिक्त उत्पन्न नाही

म्हणजेच क्रेडिट कार्ड हे उधारीवर खरेदी करण्याचं साधन आहे, ते अतिरिक्त उत्पन्न नाही, हे लक्षात ठेवा.

How to Use Credit Cards?

|

Sakal

क्रेडिट स्कोअर (CIBIL Score)

तुमचा क्रेडिट स्कोअर (CIBIL Score)चांगला ठेवण्यासाठी नेहमी ३० टक्क्यापेक्षा कमी लिमिट वापरा.

How to Use Credit Cards?

|

Sakal

ऑफरचा फायदा घ्या

क्रेडिट कार्डवर अनेकदा चांगल्या ऑफर (Offers), कॅशबॅक, डिस्काऊंट, रिवार्ड पाँइंट्स मिळतात, याचा फायदा घेता येतो.

How to Use Credit Cards?

|

Sakal

पैसे रोख काढणे टाळा

क्रेडिट कार्डवरून पैसे रोख (Cash) काढणे शक्यतो टाळा, कारण त्यावर बँका सुरुवातीपासूनच प्रचंड व्याज आकारते आणि शुल्क (Cash Advance Fee) आकारतात. त्याचा फटका CIBIL स्कोअरलाही बसतो.

How to Use Credit Cards?

|

Sakal

गोपनीय माहिती

क्रेडिट कार्डचा CVV, एक्सपायरी डेट, कार्ड नंबर किंवा OTP कोणाला सांगू नका.

How to Use Credit Cards?

|

Sakal

स्मार्ट फायनान्शियल पर्याय

क्रेडिट कार्ड हे पैशांचे संकट दूर करणारे साधन नसून तो एक स्मार्ट फायनान्शियल पर्याय आहे.

How to Use Credit Cards?

|

Sakal

पगार कितीही असला तरी असं करा आर्थिक नियोजन; ५ महत्त्वाच्या टीप्स

Simple Financial Planning Tips | Sakal
येथे क्लिक करा