Pranali Kodre
कोणत्याही व्यक्तीसाठी आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते.
आर्थिक नियोजन नीट केल्यास आयुष्यातील आर्थिक अडचणी कमी करण्यास मदत मिळते. त्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टीप्स जाणून घ्या.
दरमहिन्यात किती कमाई होते आणि किती खर्च होतो, याची नोंद ठेवा.
पगार हातात आला की आधी बचत किंवा गुंतवणूक करा आणि मग उरलेल्या पैशातून खर्च करा.
दरमहिन्याला काही रक्कम आपत्कालीन निधी म्हणून बाजूला करा. किमान ६ महिन्यांच्या खर्चाएवढे पैसे आपत्कालीन निधी म्हणून बचत करा.
कर्ज घेणं टाळा, EMI असेल तर तो पगाराच्या ३०-३५ टक्क्यांपेक्षा अधिक ठेवू नका.
लहान रक्कम असली तरी गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. SIP / PPF / RD सुरू करा. त्यामुळे तुम्हालाच भविष्यात मदत होईल.
आरोग्य विमा किंवा जीवन विमा महत्त्वाचा आहे, ज्यामुळे आजारपणात किंवा अचानक उद्भवलेल्या वैद्यकिय कारणामुळे अचानक तुमच्या आर्थिक ताण येणार नाही.
80C, 80D, NPS, ELSS यांचा वापर करून टॅक्स कमी करा आणि गुंतवणूक वाढवा.
घर खरेदी, मुलांचे शिक्षण, रिटायरमेंट अशी उद्दिष्टे असतील, तर त्यासाठी वेगळं नियोजन ठेवा आणि तशी गुंतवणूक करा.
पैसा कसा वापरायचा, किती साठवायचा आणि किती गुंतवायचा आणि किती खर्च करायचा याचं योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, ५० टक्के गरजेचे खर्च, ३० टक्के गुंतवणूक, १० टक्के विमा, १० टक्के तुमच्या इच्छा.