आरोग्यासोबतच त्वचेसाठी फायदेशीर आहे जवस, असा करा वापर

Monika Lonkar –Kumbhar

जवस

जवसमध्ये अनेक प्रकारच्या पोषकघटकांचा, व्हिटॅमिन्स अन् मिनरल्सचा समावेश आढळून येतो.

त्यामुळे, जवस आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. जवसपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.

त्वचेसाठी

परंतु, तुम्हाला हे माहित आहे का? की, जवस आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठी अतिशय लाभदायी आहे.

कोरडेपणा कमी करण्यासाठी

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही जवसाची मदत घेऊ शकता. जवसची पावडर करून त्यात २ चमचे दूध मिसळून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनंतर चेहरा धुवा.

ग्लोईंग त्वचेसाठी

जवसमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडसारख्या अनेक पोषकतत्त्वांचा समावेश आढळतो. हे पोषकघटक त्वचेला ग्लोईंग बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

पिंपल्स हटवण्यासाठी

जवसाची बारीक पावडर करून घ्या, यामध्ये २ चमचे गुलाबजल मिसळून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होईल.

मऊ त्वचेसाठी

जवसमध्ये असलेल्या पोषकतत्वांमुळे, त्वचेचे योग्य प्रकारे पोषण होते आणि त्वचा मऊ राहते.

मे महिन्यात फिरायला जाण्यासाठी 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स

travel diaries | esakal