Apurva Kulkarni
विराट आणि अनुष्काची जोडीचे लाखो चाहते आहेत. विराट-अनुष्का नेहमीच एकमेकांची काळजी घेताना दिसत असतात.
विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या दोघांना परफेक्ट कॉबीनेशन म्हटलं जातं.
परंतु तुम्हाला माहिती आहे का? विराट आणि अनुष्काची पहिली भेट कशी झाली? तर जाणून घेऊया...
अनुष्का आणि विराट कमर्शियल शुटिंगवेळी एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते.
विराटने एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे. तो म्हणाला की,'शुटिंगमध्ये माझ्यापेक्षा अनुष्का उंच दिसत होती. त्यामुळे मी अनुष्काला म्हटलं,'
'तुम्ही अजून मोठ्या हिलच्या सॅन्डल का घातल्या नाही?' त्यावर अनुष्का भडकून म्हणाली की, 'एक्सक्यूज मी' तिचं बोलणं एकून मला कळलं की माझा विनोद भारी पडलाय.'
'त्यानंतर मी अनुष्काला पाहून थरथर कापत होतो. परंतु पुर्ण शुटिंगमध्ये अनुष्का कॉन्फिडन्ट होती.'
'त्यानंतर आमच्यात हळूहळू बोलणं वाढलं, आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं'
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने डिसेंबर 2017 मध्ये इटलीत धुमधडाक्यात लग्न केलं.