रस प्यायला ये माय म्हणणारी व्हायरल मोगरा नेमकी आहे कोण?

सकाळ वृत्तसेवा

रस प्यायला ये माय!

मोगराचा एक छोटासा डायलॉग सोशल मिडियावरचा सुपरहिट ट्रेंड बनला आहे.

कोण आहे मोगराजान?

मोगराजानचं खरं नाव आहे मोगरा पवार. ती इंस्टा आणि यूट्यूबवर छोटे व्हिडिओ बनवते.

सुनील मोरे कोण?

मोगराचा दावा आहे की, सुनील मोरेसोबत तिचं लग्न झालं होतं, पण तो तिला सोडून गेला!

त्या दिवसाची आठवण…

एकदा ती उसाचा रस प्यायला गेली होती. तिथेच तिने म्हटलं, “रस प्यायला ये माय!”

व्हिडिओ झाला वायरल!

हा डायलॉग असलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. त्याचे मीम्स, रील्स बनले आणि लाखो लोकांनी शेअर केला!

संगीतकार सचिन कुमावत यांची एन्ट्री!

अहिराणी संगीतकार सचिन कुमावतने मोगरासोबत गाणं बनवलं ... “रस प्यायला ये माय”

गाण्याला मिळाले २७ लाख व्ह्यूज!

फक्त ७ दिवसांत यूट्यूबवर २७ लाख व्ह्यूज मिळवणारं हे ट्रेंडिंग साँग ठरलं आहे

मोगराचे ठुमकेही चर्चेत!

हे गाणं सचिन सोबत मोगराजानने गायलं असून तिच्या व्हिडिओने सोशल मिडिया गाजवला आहे

लोकांचा फुल रिअ‍ॅक्शन!

लोक मीम्स बनवताहेत, डायलॉग रिपीट करताहेत – मोगराजानचा अंदाज साऱ्यांना भावलाय!

मोगराजानचा ट्रेंड सुरूच!

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोगराजानच्या व्हिडिओचीच चर्चा आहे… रस प्यायला ये म्हणलं माय!

कामोत्तेजनासाठी मुघल नेमकं काय खायचे?

mughal | esakal
येथे क्लिक करा