Sandip Kapde
दायमाबाद ते इनामगाव – महाराष्ट्राच्या काळ्या मातीची शेतकऱ्यांशी असलेली नाळ किती जुनी आहे, हे पुरावे सांगतात.
दायमाबाद ते इनामगाव – महाराष्ट्राच्या काळ्या मातीची शेतकऱ्यांशी असलेली नाळ किती जुनी आहे, हे पुरावे सांगतात.
"इडापिडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे!" छत्रपतींनीही स्वराज्य रचताना रयतेला – शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले होते.
अश्मयुगीन माणूस भटकंती करत होता, पण जमिनीत पेरल्यावर काही उगवतं हे लक्षात आलं – आणि शेतीचा जन्म झाला.
सिंधू संस्कृतीत शेती, पशुपालन, शहर वस्ती, आणि घाटाची भांडी – सर्व आधुनिकतेचे पुरावे आढळतात. मात्र आज ती जागा पाकिस्तानात आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथे सापडलेले अवशेष हे सिंधू संस्कृतीच्या समकाळातील – इ.स.पू. २२०० चे आहेत!
पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव साळी यांच्या उत्खननात शेती, गोठे, धान्यकोठार, मातीची घरे, रंगीत भांडी यांचे पुरावे सापडले.
पुण्याजवळच्या इनामगाव येथे १९६८ मध्ये सापडलेली प्राचीन गढी, मोठ्या चुली, भाकरी भाजण्याचे अंगण, दफनभूमी – सर्वांनी ‘जोर्वे संस्कृती’चे दर्शन घडवले.
येथे गहू, तांदूळ, मसूर, तीळ इत्यादींची शेती, नद्यांवर आधारित सिंचन, गुरांचे गोठे आणि पशुपालन, चुली व रंगीत भाजलेली भांडी – हे शेतकऱ्याच्या जीवनशैलीचे चित्र होते.
इनामगावच्या घोडनदीवर पूर आल्यानंतर पाणी वळवून साठवण्याचे तंत्र – हजारो वर्षांपूर्वीच्या दूरदृष्टीची साक्ष!
सोन्याची कर्णफुले, मणी, सोनाराचं घर, मूस आणि तांब्याचे चिमटे – हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे जुने चित्र दर्शवतात.
शिरोहीन देवता, बैलजोडीचा रथ, मातीची चित्रे व खेळणी – यावरून शेतीशी संबंधित देवांची पूजाअर्चा आणि त्यांची धार्मिकता व सर्जनशीलता एकत्र दिसत होती.
इ.स.पू. १००० नंतर हवामान बदलले आणि वसाहती ओस पडल्या. पुढची तीन हजार वर्षे इथे कोणीही स्थायिक राहिलं नाही – म्हणूनच पुरावे शाबूत राहिले!