विधानसभेत नऊवारीतून धडक! मराठवाड्याची पहिली महिला आमदार कोण?

Sandip Kapde

हदगाव मतदारसंघ

मराठवाड्याच्या हदगाव मतदारसंघातून निवडून आलेल्या अंजनाबाई पाटील वायपनकर या नऊवारी लुगडं नेसून विधानसभेत जाणाऱ्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या.

marathwada-first-woman-mla | esakal

वंचित

त्या शिक्षणापासून वंचित होत्या, पण तरीही त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलं आणि विधानसभेत दमदार उपस्थिती नोंदवली.

marathwada-first-woman-mla | esakal

सुर्यकांता पाटील

त्यांच्या मुली सुर्यकांता पाटील यांनीही पुढे त्याच मतदारसंघातून आमदार होऊन आईचा वारसा पुढे चालवला.

marathwada-first-woman-mla | esakal

माय-लेकी

माय-लेकी एकाच मतदारसंघातून निवडून येणं हे मराठवाड्याच्या राजकारणात दुर्मीळ आणि ऐतिहासिक घडामोड ठरली.

marathwada-first-woman-mla | esakal

अंजनाबाई

अंजनाबाईंच्या जीवनात फारशा सुखसोयी नव्हत्या, पण त्यांचा साधेपणा आणि त्यागमय जीवनशैली साऱ्यांना प्रेरणा देणारी होती.

marathwada-first-woman-mla | esakal

होस्टेलचं जेवण

त्यांनी कधीही होस्टेलचं जेवण खाल्लं नाही; स्वतः भाकरीचं पीठ घेऊन जाऊन रूममध्ये जेवण तयार करत असत.

marathwada-first-woman-mla | esakal

कार्यकाळ

त्यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यावर पुढील निवडणुकीसाठी तिकीट नाकारलं आणि आपलं राजकीय जीवन संपवलं.

marathwada-first-woman-mla | esakal

कुटुंबाचा आदर

त्यांच्या राजकारणात येण्यामागे केवळ पक्षाचा आग्रह नव्हता, तर शहीद पतीचा आणि कुटुंबाचा आदरही त्यामागे होता.

marathwada-first-woman-mla | esakal

निरक्षर

अंजनाबाई निरक्षर होत्या, पण त्यांची कन्या सुर्यकांताबाईंनी त्यांना सही करायला आणि नंतर वाचायलाही शिकवलं.

marathwada-first-woman-mla | esakal

इतिहास

१९५७ च्या निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाचे दिग्गज शामराव बोधनकर यांचा पराभव करून इतिहास रचला.

marathwada-first-woman-mla | esakal

सासरे

सासरे माधवराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पक्षाच्या पाठबळामुळे त्या प्रभावी आमदार बनल्या.

marathwada-first-woman-mla | esakal

स्मरण

त्यांच्या निधनानंतरही अंजनाबाईंचं स्मरण हे मराठवाड्यातील पहिल्या महिला आमदार म्हणून कायम राहिलं आहे.

marathwada-first-woman-mla | esakal

पुण्याच्या चाकणला औरंगजेबाने नाव दिलं ‘इस्लामाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा