Mansi Khambe
सध्या राज्यभरात गणरायाच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली जात आहे. खासकरुन मुंबईतील लालबाग-परळ या भागात गणेशोत्सवाचा एक वेगळ उत्साह, लगबग दिसून येत आहे.
Mumbai 100 years ago ganeshotsav
ESakal
लालबाग-परळ भागात अनेक प्रसिद्ध गणेश मंडळं आहेत. ज्यामध्ये लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, परळीचा राजा अशी अनेक प्रसिद्ध गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लोक येथे येतात.
Mumbai 100 years ago ganeshotsav
ESakal
मुंबईतील गणेशोत्सवाची एक वेगळीच ओळख असून त्याची भुरळ देश-विदेशात आहे. अनेक जण लांबून मुंबईचा गणेशोत्सव अनुभवण्यासाठी येतात.
Mumbai 100 years ago ganeshotsav
ESakal
मुंबईतील सर्वात जुने सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून १२५ वर्षापूर्वीचे गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ मंडळ प्रसिद्ध आहे. या गणेशाेत्सवास स्वत: लोकमान्य टिळकांनी १६ सप्टेंबर १९०१ रोजी भेट दिली होती.
Mumbai 100 years ago ganeshotsav
ESakal
सध्या डीजे, मोठी गाणी लावून गणरायाचे आगमन केले जात असल्याचे दिसून येते. मात्र १०० वर्षांपूर्वी मुंबईत मोठा आवाज असलेलं बॉलीवूड संगीतही किंवा कसलीही जड सजावट न करता उत्सव साजरा केला जात होता.
Mumbai 100 years ago ganeshotsav
ESakal
तसेच आजच्यासारखी अवाढव्य रोषणाई, थिम्स किंवा मखर १०० वर्षांपूर्वी नसत. मातीची पारंपरिक मूर्ती आणि साध्या फुलांची सजावट असे साधे स्वरूप होते.
Mumbai 100 years ago ganeshotsav
ESakal
मुंबईतील असे अनेक गणेश मंडळं आहेत जे आजही जुन्या परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा करतात. यामध्ये ठाण्यातील लोकमान्य आळी येथील पंडालने गेल्या १०० वर्षांत आपल्या उत्सवाची पारंपरिक पद्धत बदललेली नाही.
Mumbai 100 years ago ganeshotsav
ESakal
१०० वर्षांपूर्वी हा गणेशोत्सव ज्या उत्साहाने सुरू झाला होता, तेवढ्याच जोमाने आजही नवीन पिढी हा उत्सव दणक्यात साजरा करत आहे.
Mumbai 100 years ago ganeshotsav
ESakal
Coffee Cup Design
ESakal