Monika Shinde
सकाळी उशी आणि बेडशीटवर घामाचे डाग दिसतात का? हे फक्त घाम नाही, तर तुमच्या आरोग्याची लक्षणे आणि शरीरातील संभाव्य गंभीर समस्यांची संकेत देतात.
सतत रात्री घाम येणे हे सामान्य झोपेचे लक्षण नाही. काही वेळा हे लक्षण कॅन्सर, ल्युकेमिया किंवा लिम्फोमा सारख्या आजारांचे प्रारंभिक संकेत असू शकतात.
उशीवर घाम जास्त प्रमाणात दिसणे, वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे गंभीर आरोग्य समस्या दर्शवते. तज्ज्ञांच्या मते, याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
त्वचेतील बदल, डार्क सर्कल्स आणि पोट फुगणे ही देखील आरोग्याची चेतावणी असू शकतात. उशी आणि बेडशीटवरील लक्षणांवर लक्ष देणे महत्वाचे आहे.
सामान्य परिस्थितीत घाम येणे हवामान किंवा जाड बेडशीटमुळे होते. पण थंड वातावरणातही सतत घाम येणे हे नाईट स्वेट्सचे लक्षण असू शकते.
नॉन-हॉजकिन लिम्फोमा, हॉजकिन लिम्फोमा, कार्सिनॉइड ट्युमर, ल्युकेमिया, मेसोथेलिओमा यांसारख्या आजारांमध्ये रात्रभर घाम येणे आढळते. वेळीच तपासणी अत्यंत आवश्यक आहे.
उशी आणि बेडशीटवर दिसणारी चिन्हे शरीराचा चेतावणी सिग्नल आहेत. हे लक्षणे लक्षात घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.