Anuradha Vipat
‘फुलपाखरू’ मालिकेतून ऋता घराघरांत पोहचली. आपल्या अभिनयाच्या जोरावर ऋताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
गेल्या वर्षीच ऋताने मुंबईत स्वत:चे हक्काचे घर घेतले.आता एका मुलाखतीत ऋताने तिच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत.
ऋताने नवीन घर घेण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. ऋता म्हणाली, “मी कधीच स्वत:च्या घरात राहिलेली नाही.
पुढे ऋता म्हणाली, गेली ३० वर्षं मी आई-बाबांबरोबर भाड्याच्या घरात राहत आले आहे. आम्ही आतापर्यंत जवळपास ११ घरं बदलली आहेत. मला फार मोठं घर नको होतं. पण, मला नेहमी असं वाटायचं की, उद्या माझं लग्न झाल्यानंतर आपलं एक हक्काचं घर असावं
ऋता पुढे म्हणाली, “मला माझ्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे होते. त्यामुळे काहीही करून मला घर घ्यायचंच होतं
ऋता दुर्गुळेने १८ मे २०२२ रोजी दिग्दर्शक प्रतीक शाहबरोबर लग्नगाठ बांधली.