IAS Success Story : UPSC परीक्षेत यश मिळवत 'ही' अभिनेत्री बनली IAS अधिकारी; 32 चित्रपटांत केलंय काम

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री कीर्तना बनली IAS अधिकारी

सिनेसृष्टीच्या झगमगाटात रमून जाण्याऐवजी देशसेवेचा कठीण, पण सन्मानाचा मार्ग निवडणाऱ्या अभिनेत्रीची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

३२ सिनेमांनंतर अभिनेत्रीने निवडला IAS चा मार्ग

लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अभिनयाला रामराम ठोकत UPSC परीक्षेत यश मिळवून IAS अधिकारी बनलेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे एच. एस. कीर्तना (HS Keerthana).

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

अवघ्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण

कीर्तनाने अवघ्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढील काळात तिने ‘गंगा-यमुना’, ‘उपेंद्र’, ‘कर्पूरदा गोम्बे’, ‘लेडी कमिशनर’, ‘हब्बा’ यांसारख्या ३२ कन्नड चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

अभिनयप्रवास ठरला यशस्वी

बालकलाकार म्हणून सुरू झालेला तिचा अभिनयप्रवास यशस्वी ठरला आणि ती सिनेसृष्टीत आपली वेगळी छाप सोडली.

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

मनात होतं देशसेवेचं स्वप्न

मोठ्या पडद्यावर यश मिळवत असतानाच कीर्तनाच्या मनात देशसेवेचं स्वप्न आकार घेत होतं. वडिलांची प्रेरणा आणि स्वतःची जिद्द यामुळे तिने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडत २०११ मध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवा (KAS) परीक्षा उत्तीर्ण केली.

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

UPSC परीक्षेची तयारी

त्यानंतर दोन वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना तिला प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. मात्र, तिचं अंतिम ध्येय IAS अधिकारी बनणं हेच होतं. त्यामुळे तिने UPSC परीक्षेची तयारी सुरू ठेवली.

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

सलग पाच अपयशांनंतर यश

या प्रवासात तिला सलग पाच वेळा अपयशाचा सामना करावा लागला. तरीही तिने हार मानली नाही.

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

UPSC मध्ये मिळवली १६७ वी रॅंक

अपयशातून शिकत, सातत्य राखत अखेर २०२० मध्ये सहाव्या प्रयत्नात UPSC परीक्षेत १६७ वा क्रमांक मिळवून तिने भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

CEO पदावर कार्यरत

आज IAS अधिकारी म्हणून चिक्कमंगळूरू जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर कार्यरत असलेली कीर्तना प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे.

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

IAS कीर्तनाचा संघर्ष

अभिनयाच्या झगमगाटातून बाहेर पडून देशसेवेचा मार्ग निवडणारी कीर्तनाची ही संघर्षमय आणि जिद्दीची कहाणी अनेक तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

HS Keerthana IAS Success Story

|

esakal

साधा पेहराव अन् धनगरी पोशाख..; IPS बिरदेव डोणेंच्या कुटुंबाचा पहिलाच विमान प्रवास, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

IPS Officer Birdev Done Journey

|

esakal

येथे क्लिक करा...