बाळकृष्ण मधाळे
अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही कोल्हापूरच्या यमगे गावातील मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणे यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर देशात ५५१ वी रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश केला.
IPS Officer Birdev Done Journey
esakal
डोणे यांच्या या यशामुळे कधीही रेल्वे प्रवास न केलेल्या कुटुंबाला थेट विमान प्रवासाची संधी मिळाली आणि हा क्षण साऱ्यांसाठीच भावूक करणारा ठरला.
IPS Officer Birdev Done Journey
esakal
कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील यमगे गावातील बिरदेव डोणे यांनी २०२४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करत आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला.
IPS Officer Birdev Done Journey
esakal
सध्या हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
IPS Officer Birdev Done Journey
esakal
प्रशिक्षण काळात आयपीएस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना अकादमीच्या मुख्यालयाला भेट देण्याची संधी दिली जाते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी बिरदेव यांच्या कुटुंबाने अकादमीला भेट दिली. धनगरी पारंपरिक वेषातच हे कुटुंब हैदराबादला दाखल झाले होते.
IPS Officer Birdev Done Journey
esakal
कोणताही बडेजाव नाही, कोणताही थाटमाट नाही अगदी साध्या पेहरावात बिरदेव यांच्या कुटुंबाने पोलीस अकादमीच्या परिसराची पाहणी केली.
IPS Officer Birdev Done Journey
esakal
लेकाच्या कर्तृत्वामुळे एवढ्या मोठ्या शहरात येण्याचा, अधिकाऱ्यांना भेटण्याचा आणि आयुष्यात पहिल्यांदाच विमान प्रवास करण्याचा आनंद त्यांच्या डोळ्यांत स्पष्टपणे दिसत होता.
IPS Officer Birdev Done Journey
esakal
कुटुंबाच्या पहिल्या विमान प्रवासानंतर बिरदेव डोणे स्वतःही भावूक झाले. “ज्या क्षणापासून मी फक्त विमान पाहण्याचे स्वप्न पाहत होतो, त्या पायऱ्या एक दिवस माझे कुटुंब चढेल, हा विचारही शब्दांच्या पलीकडचा आहे. हा क्षण व्यक्त करता येण्यासारखा नाही फक्त कृतज्ञता,” अशी भावूक पोस्ट त्यांनी समाज माध्यमांवर शेअर केली आहे.
IPS Officer Birdev Done Journey
esakal
बिरदेव डोणे यांची ही प्रेरणादायी वाटचाल आज अनेक तरुणांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
IPS Officer Birdev Done Journey
esakal
Lionel Messi Diet
esakal