Mayur Ratnaparkhe
WWE चा सर्वात संस्मरणीय आणि शक्तिशाली चेहरा असलेला हल्क होगनचे निधन झाले आहे.
हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या ७१ व्या वर्षी फ्लोरिडा येथील राहत्या घरी निधन झाले.
हल्क होगनच्या निधनाने, अमेरिकेपासून भारतापर्यंत रेसलिंगला पॉप संस्कृती बनवणाऱ्या एका युगाचा अंत झाला आहे.
हल्क होगनची एकूण संपत्ती २५ दशलक्ष डॉलर असल्याची माहिती समोर आली आहे.
हल्क होगनने कारकिर्दीत चार दशके WWE आणि WCW वर वर्चस्व गाजवले होते.
त्याने WWE च्या पहिल्या ८ रेसलमेनियापैकी ७ सामन्यांमध्ये भाग घेतला आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांना वेड लावले होते.
हल्क होगनने रेसलिंग व्यतिरिक्त अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते.
व्हीएच१ च्या होगन नोज बेस्ट या रिअॅलिटी शोमधूनही त्याने प्रसिद्धी मिळवली आणि मोठ्या ब्रँड्सचा चेहरा बनला होता.