Saisimran Ghashi
आतड्यांना सूज (Intestinal Inflammation) ही एक गंभीर समस्या असू शकते, जी अनेक कारणांमुळे होऊ शकते
या सूजेची वेळेवर दखल घेतली नाही, तर ती आणखी गंभीर रूप धारण करू शकते.
पोटात वारंवार मुरडा येणे किंवा तीव्र वेदना होणे हे आतड्यांतील सूजेचे स्पष्ट लक्षण असू शकते.
जुलाब (अतिसार) किंवा बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे) यांचा वारंवार त्रास होत असेल, तर ती आतड्यांतील असंतुलनाची चिन्हे आहेत.
जेवणानंतर पोट जास्त फुगणे, जड वाटणे आणि गॅस होणे हे देखील सूजेचे लक्षण असू शकते.
शौचाच्या वेळी मलात रक्त दिसणे ही गंभीर लक्षणांपैकी एक आहे. ही IBD किंवा ulcerative colitis यासारख्या आजाराचे निदर्शक असू शकते.
शरीरात सूज असल्यास पोषणद्रव्यांचे योग्य शोषण होत नाही, यामुळे सतत थकवा जाणवणे आणि अचानक वजन कमी होणे ही लक्षणे दिसतात.
सतत आतडीला सूज येत राहिल्यास आतड्या खराब होऊ शकतात
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.