सूरज यादव
उपोषणामुळे पहिल्या २४ तासात रक्तातील साखरेची पातळी कमी होत जाते. त्यामुळे चक्कर येणं, डोकेदुखी यासारखा त्रास होतो.
hunger strike effect
Esakal
एक दोन आठवडे उपोषणानंतर शरीरातील फॅट कमी झाल्यानंतर प्रोटीन हाच पर्याय असतो. त्यासाठी शरीर मांसपेशींपासून उर्जा मिळवते.
hunger strike effect
Esakal
तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ उपोषण केल्यास शरीराच्या अवयवांवर परिणाम व्हायला सुरुवात होते. शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते आणि संसर्गाचा धोका असतो.
hunger strike effect
Esakal
डिहायड्रेशनमुळे पाणी कमी होणं किंवा टॉक्सिन्ससारखे विषारी पदार्थ वाढल्यानं किडनी काम करणं बंद होऊ शकते. युरिक अॅसिड वाढल्यानं किडनीला धोका निर्माण होऊ शकतो.
hunger strike effect
Esakal
शरीरातील फॅट किंवा मांसपेशींमध्ये बदलामुळे लिव्हरवर ताण येऊ शकतो. यामुळे फॅटी लिव्हर किंवा लिव्हर निकामी होण्याची शक्यता असते.
hunger strike effect
Esakal
शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडल्यानंतर आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे हृदयाची गती कमी जास्त होते. यामुळे हृदयविकाराचा धक्का किंवा कार्डियाक अरेस्टचा धोका असतो.
hunger strike effect
Esakal
शरीरात मेंदू नीट काम करण्यासाठी ग्लुकोज आणि इलेक्टोरलाइट्सची गरज असते. याच्या कमतरतेमुळे अंधुक दिसणं, चक्कर येणं किंवा कोमामध्ये जाणं अशा स्थिती निर्माण होऊ शकते.
hunger strike effect
Esakal
बराच काळ न खाल्ल्यानं पोटात अॅसिडचं प्रमाण वाढतं. यामुळे पोटात अंतर्गत रक्तस्रावाची शक्यता असते. याचा परिणाम पचनसंस्थेवर होऊ शकतो.
hunger strike effect
Esakal
Know how India's Parliament is protected
esakal