शस्त्रक्रिया करून पुन्हा व्हर्जिन होता येतं का?

Shubham Banubakode

व्हर्जिनिटी म्हणजे काय?

समाजात कौमार्याबद्दल अनेक समजुती आहेत. मात्र, वैद्यकीय विज्ञानानुसार व्हर्जिनिटी ही कोणतीही शारीरिक किंवा जैविक स्थिती नसून सामाजिक संकल्पना आहे.

Hymenoplasty

|

esakal

हाइमनोप्लास्टी म्हणजे काय?

हाइमनोप्लास्टी ही एक वैकल्पिक शस्त्रक्रिया आहे. यामध्ये योनीच्या मुखाजवळ असलेल्या हायमन म्हणजेच पातळ पडद्याची बनावट पुन्हा तयार केली जाते.

Hymenoplasty

|

esakal

व्हर्जिनिटी परत मिळते?

या शस्त्रक्रियेमुळे केवळ हायमनची बनावट बदलता येते. मात्र, यामुळे खरी व्हर्जिनिटी पुन्हा मिळते, असा दावा वैद्यकीयदृष्ट्या करता येत नाही.

Hymenoplasty

|

esakal

हायमन का तुटतो?

केवळ शारीरीक संबंधांमुळे हायमन तुटत नाही. सायकल चालवणे, खेळणे, धावणे, घोडेस्वारी किंवा टॅम्पॉन वापरणे अशा कारणांमुळेही हायमन ताणला किंवा फाटू शकतो.

Hymenoplasty

|

esakal

शस्त्रक्रिया कशी होते?

या शस्त्रक्रियेत हायमनचे उरलेले तुकडे एकमेकांना जोडले जातात. तुकडे नसल्यास योनीच्या आतील ऊतींचा वापर करून नवीन पडदा तयार केला जातो.

Hymenoplasty

|

esakal

किती वेळ लागतो?

ही शस्त्रक्रिया साधारण ३० ते ६० मिनिटांत पूर्ण होते. यासाठी भूल दिली जाते आणि विरघळणारे टाके वापरले जातात.

Hymenoplasty

|

esakal

किती विश्रांती घ्यावी?

शस्त्रक्रियेनंतर शरीर पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारण चार ते सहा आठवडे लागू शकतात. या काळात डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

Hymenoplasty

|

esakal

रक्तस्राव होतो का?

अनेक महिला या शस्त्रक्रियेनंतर संबंधांदरम्यान रक्तस्राव होईल, अशी अपेक्षा ठेवतात. मात्र, रक्तस्राव होण्याची शंभर टक्के खात्री देता येत नाही.

Hymenoplasty

|

esakal

इस्राएलमध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपर का वापरतात?

election

|

esakal

हेही वाचा -