Aarti Badade
जेव्हा रक्तातील शुगरची पातळी सामान्याहून खूप खाली घसरते, तेव्हा त्या स्थितीला हायपोग्लायसीमिया (Hypoglycemia) असे म्हणतात.
Sakal
शुगर ही शरीर आणि मेंदूला एनर्जी देत असते; ती कमी झाल्यास थकवा, चिडचिडेपणा, कमजोरी, हातपाय थंड होणे आणि चक्कर येणे असे संकेत मिळतात.
Sakal
जर वेळीच लक्ष न दिल्यास डोकेदुखी, हृदय धडधडणे, घाम येणे, नजर धूसर होणे, बोलण्यात अडचणी येणे आणि बेशुद्ध पडणे अशी धोकादायक स्थिती येऊ शकते.
Sakal
शुगर ही मेंदूची मुख्य एनर्जी असल्याने, ती कमी झाल्यास मेंदू नीट काम करत नाही; त्यामुळे एकाग्रता करता येत नाही आणि विचार करण्याची क्षमता प्रभावित होते.
Sakal
बराच वेळ उपाशी राहणे, जास्त व्यायाम, इन्सुलिन किंवा डायबेटीज औषधांचे अधिक सेवन, हार्मोन्स असंतुलन आणि लिव्हर-किडनीच्या समस्या हे हायपोग्लायसिमियाची कारणे असू शकतात.
Sakal
अशी गंभीर स्थिती आल्यास शरीराला तातडीने एनर्जीची गरज असते, त्यामुळे लागलीच उपचारांची (उदा. गोड पदार्थ खाण्याची) आवश्यकता असते.
Sakal
हायपोग्लायसिमियापासून वाचण्यासाठी वेळेत जेवावे, संतुलित आहार घ्यावा, गोड पदार्थ सोबत बाळगावे आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेत घ्यावीत.
Sakal
Sakal