IAS अधिकारी परदेश दौऱ्यावर का जाऊ शकत नाहीत? जाणून घ्या खरं कारण

Shubham Banubakode

परवानगी आवश्यक

IAS अधिकारी अखिल भारतीय सेवेचे सदस्य असतात. त्यामुळे परदेशात जाण्यापूर्वी त्यांना ठराविक नियमांनुसार सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते.

IAS officer foreign travel

|

esakal

नियम

परदेश प्रवासाबाबतचे नियम All India Services (Leave) Rules, 1955 आणि केंद्र सरकारच्या DoPT च्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू होतात.

IAS officer foreign travel

|

esakal

पूर्वपरवानगी

सुट्टीवर असताना खासगी कारणांसाठी परदेशात जायचं असेल तरी संबंधित राज्य सरकार किंवा सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक असते.

IAS officer foreign travel

|

esakal

सरकार काय तपासते?

प्रवासाचा उद्देश, खर्च, निधीचा स्रोत, मुक्कामाचा कालावधी याची तपासणी सरकारद्वारे केली जाते.

IAS officer foreign travel

|

esakal

२१ दिवसांत निर्णय

महत्त्वाचे म्हणजे सरकारकडे अर्ज केल्यानंतर सरकारला २१ दिवस निर्णय घेणं बंधनकारक असतं, जर सरकारने निर्णय न घेतल्यास, ही परवानगी समजली जाते.

IAS officer foreign travel

|

esakal

केंद्राची मंजुरी

DoPT ने काही प्रकरणांमध्ये अधिकार राज्य सरकारांना दिले आहेत. मात्र, तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा दौरा असेल तर केंद्रांची मंजुरी आवश्यक असते.

IAS officer foreign travel

|

esakal

शिस्तभंगाची कारवाई

परवानगी न घेता परदेश प्रवास केल्यास सेवा नियमांचे उल्लंघन मानले जाऊ शकते आणि संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असते.

IAS officer foreign travel

|

esakal

मुख्य उद्देश

सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यात पारदर्शकता, राष्ट्रीय सुरक्षा, प्रशासकीय जबाबदारी आणि हितसंबंधांचा संघर्ष टाळणे हा या नियमांचा मुख्य उद्देश आहे.

IAS officer foreign travel

|

esakal

दररोज लवंगाचं पाणी पिणं फायदेशीर की धोकादायक?

Drinking Clove Water Daily

|

esakal

हेही वाचा -