Pranali Kodre
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज ११ वेगवेगळ्या प्रकारे बाद होऊ शकतो. यातील एक प्रकार म्हणजे धावबाद.
खेळपट्टीवर असणारे दोन फलंदाज धाव घेत असताना क्षेत्ररक्षकाने किमान एक तरी फलंदाज क्रिजमध्ये पोहचण्यापूर्वी तो पळत असलेल्या दिशेच्या स्टंपवरील बेल्स चेंडूने उडवले, तर धावबाद दिले जाते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा धावबाद होणाऱ्या ५ खेळाडूंचा थोडक्यात आढावा घेऊ.
पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंजमाम-उल-हक या विक्रमाच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. तो ४६ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावबाद झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७ वेळा धावबाद झाला असून तो या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेचा मार्वन अटापट्टू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ वेळा धावबाद झाला असून तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू माहेला जयवर्धने या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून तो ५१ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावबाद झाला आहे.
भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड या विक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तो सर्वाधिक ५३ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावबाद झाला आहे.