Mayur Ratnaparkhe
या यादीतील पहिला गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली आहे. त्याने २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली.
ब्रेट लीनंतर १४ वर्षांनी, आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने आयसीसी टी२० विश्वचषकात हॅट्रिक घेतली. त्याने नेदरलँड्सविरुद्ध ही कामगिरी केली.
श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगानेही २०२१ च्या टी२० विश्वचषकात हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानेही २०२१ च्या आयसीसी टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध हॅटट्रिक घेऊन खळबळ उडवून दिली.
संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा कार्तिक मयप्पन हा आयसीसी टी२० विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा पाचवा गोलंदाज आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली.
आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोश लिटलने न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली आणि तो सहावा गोलंदाज ठरला.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सलग दोन हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केला आहे. बांगलादेशविरुद्ध आणि अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेत त्याने इतिहास रचला.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने २०२४ च्या आयसीसी टी२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्ध खेळताना हॅट्रिक घेतली.
Chocolate Day Celebration Ideas
sakal