Pranali Kodre
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला १५ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.
U19 World Cup trophy photoshoot with cheetah
Sakal
ही स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबिया या दोन देशांमध्ये खेळवली जात आहे.
U19 World Cup trophy photoshoot with cheetah
Sakal
दरम्यान, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी १९ वर्षांखाल वर्ल्ड कप ट्रॉफीचे नामिबियातील नॅशनल पार्कमध्ये खास फोटो शूट करण्यात आले.
U19 World Cup trophy photoshoot with cheetah
Sakal
हे फोटोशूट चक्क चित्त्यांसोबत एका अभयारण्यात करण्यात आले. या शूटचे फोटो आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
U19 World Cup trophy photoshoot with cheetah
Sakal
या फोटोमध्ये दिसते की जगातील वेगवान प्राणी असलेला चित्ता ट्रॉफी भोवती ऐटीत उभा आहे, तर दुसरा चित्ता आरामात खाली बसला आहे.
U19 World Cup trophy photoshoot with cheetah
Sakal
तथापि, आयसीसीने हे स्पष्ट केले की हे फोटो शूट सुरक्षित वातावरणात करण्यात आले असून यावेळी प्राणी हाताळणारे तज्ज्ञ लोकं त्यांच्यासोबत होते. यात कोणच्याही सुरक्षेला हानी पोहचवण्यात आलेली नाही.
U19 World Cup trophy photoshoot with cheetah
Sakal
दरम्यान, हे फोटो शूट १९ वर्षांखालील क्रिकेटला जागतील स्तरावर आणखी ओळख मिळवण्याचे प्रयत्न म्हणून आणि या ठिकाणाच्या नैसर्गिक देणगीचा स्वीकार या हेतूने करण्यात आले होते.
U19 World Cup trophy photoshoot with cheetah
Sakal
तसेच चित्ता हा प्राणी वेग, ताकद आणि युवा ऊर्जा दाखवतो, हे मूल्य १९ वर्षांखालील क्रिकेटचेही प्रतिनिधित्व करतात.
U19 World Cup trophy photoshoot with cheetah
Sakal
Virat Kohli
Sakal