सकाळ डिजिटल टीम
गूळ हा फक्त चविष्टच नव्हे, तर शरीरासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. विशेषतः हिवाळ्यात तो शरीर उबदार ठेवतो आणि पचन सुधारतो. मात्र, बाजारात नकली गूळ विकला जात असल्याने खरा आणि बनावट गूळ यातील फरक ओळखणं फार महत्त्वाचं आहे.
खरा गूळ गडद तपकिरी किंवा सोनेरी रंगाचा असतो. त्याची पोत घन, गुळगुळीत आणि थोडीशी चमकदार असते.
नकली गूळ साधारणतः फारच हलक्या रंगाचा असतो आणि त्याची पोत पावडरसारखी किंवा सैलसर असते.
नैसर्गिक खऱ्या गुळाला मधुर आणि गोडसर सुगंध येतो.
नकली गूळ सुगंधरहित असतो किंवा त्याला रासायनिक, विचित्र व अप्रिय वास येतो.
खऱ्या गुळाची चव गोडसर, थोडीशी खमंग आणि नैसर्गिक असते.
नकली गूळ खाल्ल्यावर तो कडवट, अप्रिय किंवा खारटसर चव देतो.
एक तुकडा गूळ पाण्यात टाका : खरा गूळ काही क्षणांत पाण्यात विरघळतो.
नकली गूळ तळाशी साठतो आणि विरघळत नाही किंवा पाणी गढूळ होऊ शकतं.
गूळ गरम केल्यास खरा गूळ सहज वितळतो आणि थोडा मऊ होतो.
बनावट गूळ वितळत नाही, त्याच स्थितीत राहतो.
तुम्ही आयोडिन, अम्लयुक्त पाण्याच्या थेंबाने गुळाची चाचणी करू शकता. जर रासायनिक बदल दिसला, तर गूळात रसायने आहेत असे समजावे.
खऱ्या गुळामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही.
बनावट गूळ शरीरात पचन समस्या, अॅसिडिटी, त्वचारोग आणि इतर विषारी परिणाम निर्माण करू शकतो. त्यामुळे गूळ खरेदी करताना सावध राहा आणि वरील चाचण्या जरूर करा.