Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धा भारत - पाकिस्तान तणावामुळे ९ मे रोजी स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे बरेच खेळाडू घरी परतले.
पण, दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्यानंतर आयपीएल २०२५ पुन्हा १७ मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आयपीएलचा अंतिम सामना ३ जून रोजी होईल.
त्यामुळे फ्रँचायझींकडून भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंनाही परत बोलवण्यात आलं आहे. मात्र, आता आयपीएल जवळपास एका आठवड्याने पुढे गेल्याने ऑस्ट्रेलिया-द. आफ्रिकन खेळाडू परत येण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
कारण, ११ जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघही जाहीर झाला आहे.
आता या संघात निवड झालेल्यांपैकी पॅट कमिन्स, जॉस हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल स्टार्क हे चौघे आयपीएलचा भाग आहेत. कमिन्स सनरायझर्स हैदराबादचा कर्णधारही आहे.
अशात क्रिकट ऑस्ट्रेलियाकडून या चौघांनी आयपीएलसाठी भारतात परतायचं की नाही, हा निर्णय खेळाडूंवरच सोपवला आहे. त्यामुळे आता जर कमिन्सने न परतण्याचा निर्णय घेतला, तर हैदराबादचा कर्णधार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, हैदराबादचे आव्हान यापूर्वीच संपले आहे, त्यांचे आता केवळ तीन सामने बाकी आहेत. अशात कमिन्स आला नाही, तर इशान किशन, हेन्रिक क्लासेन किंवा अभिषेक शर्मा यांच्याकडे नेतृत्वाची धूरा दिली जाऊ शकते.