सकाळ वृत्तसेवा
होय, तुम्ही बरोबर वाचलंत. युरोपमधला छोटासा देश लिकटेंस्टीन (Liechtenstein) काही दिवसांसाठी भाड्याने मिळत होता. तेही एखाद्या हॉटेलसारखा, पण इथे तुम्हाला राजा बनाव लागत होतं.
Liechtenstein Travel
Sakal
2010 मध्ये या देशाने एक भन्नाट मार्केटिंग मोहीम राबवली. कोणालाही 70,000 डॉलर्स देऊन दोन रात्रींसाठी संपूर्ण देश भाड्याने घेता येत होता. त्यात 900 पाहुण्यांची राहण्याची सोय, 500 बेडरूम्स आणि आलिशान बाथरूम्सचा समावेश होता.
Liechtenstein Travel
Sakal
भाड्याने देश घेणाऱ्याला काही ‘स्पेशल’ हक्क मिळत होते, त्यात स्वतःचा झेंडा आणि साइन बोर्ड लावण्याची परवानगी, स्वतःचं चलन बनवण्याचा अधिकार, आणि देशाचे खरे राजकुमार हंस अॅडम द्वितीय यांच्यासोबत खासगी वाईन टेस्टिंगचा आनंद.
Liechtenstein Travel
Sakal
ही योजना फक्त जाहिरातीसाठी नव्हती तर लिकटेंस्टीनच्या निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचं सौंदर्य जगासमोर आणण्यासाठी होती. राजधानी वाडूझ आणि तिच्या डोंगरावर वसलेला राजघराण्याचा किल्ला हे प्रमुख आकर्षण होतं.
Liechtenstein Travel
Sakal
हा किल्ला राजकुमारांचा अधिकृत निवासस्थान आहे. सामान्य लोकांना आत प्रवेश नसला तरी,
किल्ल्याच्या टोकावरून दिसणारे दृश्य, डोंगर, हिरव्यागार दऱ्या, आणि वाडूझ शहर हे स्वर्गीय वाटतं.
Liechtenstein Travel
Sakal
गुटेनबर्ग किल्ला हा लिकटेंस्टीनमधील सर्वात जुना आणि सुरक्षित किल्ला आहे. हा आता संग्रहालय म्हणून ओळखला जातो. इतिहासप्रेमी आणि प्रवाशांसाठी हा ‘टाईम मशीन’सारखा अनुभव देणारा आहे.
Liechtenstein Travel
Sakal
पायी भटकंती किंवा माउंटन बायकिंग आवडणाऱ्यांसाठी वाइल्डस्लॉस किल्ला परफेक्ट आहे.
हा किल्ला शांत आणि सुंदर आहे.
Liechtenstein Travel
Sakal
हा देश फक्त नकाशावर छोटा आहे, पण अनुभवांच्या बाबतीत मोठ्या देशांनाही मागे टाकणारा आहे.
Liechtenstein Travel
Sakal
तुम्ही स्वतःचा झेंडा लावू शकता, राजकुमारासोबत वाईन पीऊ शकता, आणि काही दिवसांसाठी ‘देशाचे मालक’ होऊ शकता.
Liechtenstein Travel
Sakal
Bonus Payment Act
Sakal