Aarti Badade
दसरा आणि दिवाळी जवळ येत असताना, प्रत्येकजण बोनसची (Bonus) वाट पाहत असतो. पण तुम्हाला माहित आहे का की कर्मचाऱ्यांना हा बोनस बोनस पेमेंट ऑफ बोनस कायद्यांतर्गत दिला जातो?
Bonus Payment Act
Sakal
दिवाळी बोनसची परंपरा भारतात १९४० मध्ये ब्रिटिश राजवटीत सुरू झाली. त्यानंतर १९६५ मध्ये बोनस पेमेंट कायदा (Payment of Bonus Act) मंजूर झाला आणि बोनस कायदेशीर अधिकार बनला.
Bonus Payment Act
Sakal
बोनस पेमेंट कायद्यानुसार, कंपन्यांना कर्मचाऱ्याच्या पगाराच्या किमान ८.३३ टक्के रक्कम बोनस म्हणून देणे आवश्यक आहे.
Bonus Payment Act
Sakal
कंपनीला नफा झाला असो वा तोटा, नियोक्त्याने (Employer) कर्मचाऱ्याच्या वार्षिक पगाराच्या किंवा वेतनाच्या किमान ८.३३% बोनस देणे आवश्यक आहे.
Bonus Payment Act
Sakal
बोनस पेमेंट अॅक्ट, १९६५ हा २० किंवा त्याहून अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या सर्व कारखान्यांना आणि आस्थापनांना (Establishments) लागू होतो.
Bonus Payment Act
Sakal
या कायद्याचा प्राथमिक उद्देश कर्मचाऱ्यांना प्रेरित करणे आणि त्यांच्या कठोर परिश्रमासाठी त्यांना बक्षीस देणे आहे. तसेच कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणे आहे.
sakal
हा बोनस कोणत्याही आर्थिक वर्षाच्या अखेरीस आठ महिन्यांच्या आत देणे आवश्यक आहे. भारतात अनेक कंपन्या हा बोनस दिवाळीच्या सणाभोवती देतात.
Sakal
Diwali Travel trip ideas
Sakal