पुजा बोनकिले
मार्च महिन्यापासून उन्हाच्या तीव्र झळा सुरू होतात.
घराबाहेर पडल्याने अनेक वेळा उष्माघात होऊ शकतो.
अशावेळी लगेच कोणते उपाय करता येईल हे जाणून घेऊया.
पाण्याची कमतरता असल्यास उष्माघात होऊ शकते. यामुळे लगेच पाणी किंवा रस प्यायल्या द्यावे.
उष्माघात कमी करण्यासाठी ओआरएस किंवा ग्लुकोज प्यावे. यामुळे चक्कर येणे कमी होते.
उष्माघात झाल्यास थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळ,मान, हातावर ठेवाव्या. यामुळे शरीराचे तापमान कमी होते.
उष्माघात झाल्यास बेलाचे सरबत प्यावे.
लिंबूपाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते
तुळस आणि पुदिन्याचा रस प्यायल्याने शरीर थंड राहते.
उष्माघात झाल्यास कांद्याचा रस कपाळ आणि छातीवर लावावे. यामुळे थंडावा मिळतो.
उन्हाळ्यात जाड आणि घट्ट कपडे घालणे टाळावे. या दिवसांमध्ये सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावे.