बुध ग्रहाची उलटी चाल! 'या' 4 राशींच्या अडचणीत होणार वाढ

Aarti Badade

बुध ग्रहाची वक्री अवस्था

गुरुवार, २६ फेब्रुवारीपासून बुद्धिमत्ता आणि संवादाचा कारक असलेला 'बुध' कुंभ राशीत वक्री होणार आहे. २१ मार्चपर्यंत ही स्थिती राहिल्याने काही राशींच्या जीवनात मोठे बदल घडून येतील.

Budh Vakri 2026 Zodiac signs warning

|

Sakal

कर्क रास - कामात सावधान!

कर्क राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी चढ-उतार येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेकडे लक्ष द्यावे. कोणताही मोठा निर्णय विचार केल्याशिवाय घेऊ नका आणि आरोग्याची काळजी घ्या.

Budh Vakri 2026 Zodiac signs warning

|

Sakal

कन्या रास - करिअरमधील आव्हाने

कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक बदल होऊ शकतात. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Budh Vakri 2026 Zodiac signs warning

|

sakal

मकर रास - वाणीवर नियंत्रण ठेवा

मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल. तुमच्या बोलण्यामुळे वाद होऊ शकतात, त्यामुळे विचार करून बोला. तसेच घसा आणि कानाशी संबंधित आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात.

Budh Vakri 2026 Zodiac signs warning

|

Sakal

मीन रास - खर्चावर मर्यादा घाला

मीन राशीच्या लोकांसाठी बुध वक्री समस्या वाढवू शकतो. गुंतवणुकीबाबत सावध राहा आणि विनाकारण होणारे खर्च टाळा. गाडी चालवताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Budh Vakri 2026 Zodiac signs warning

|

Sakal

काय काळजी घ्यावी?

बुध वक्री असताना नवीन व्यावसायिक करार करणे किंवा मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळावे. संवादातील गोंधळ टाळण्यासाठी आपले म्हणणे स्पष्टपणे मांडावे.

Budh Vakri 2026 Zodiac signs warning

|

Sakal

बुध ग्रहाचे उपाय

बुध ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी गणपतीची उपासना करा आणि हिरव्या वस्तूंचे दान करा. यामुळे मानसिक शांतता लाभण्यास मदत होईल.

Budh Vakri 2026 Zodiac signs warning

|

Sakal

होलाष्टकात काय करू नये? ‘ही’ कामे टाळाच, अन्यथा वाढतील अडथळे

Holashtak 2026

|

sakal

येथे क्लिक करा