सकाळ डिजिटल टीम
दाराला उंबरठा असणे महत्वाचे का मानले जाते या मागची कारण काय आहेत तुम्हाला माहित आहे का?
वास्तूनुसार दाराला उंबरठा का असावा? या मागे कोणती कारणं आहेत जाणून घ्या.
दाराला उंबरठा असणे वास्तूशास्त्रानुसार महत्वाचे मानले जाते
उंबरठा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतो आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवतो, असे मानले जाते.
उंबरठा घरासाठी एक सीमा निश्चित करतो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित वाटते आणि बाहेरील व्यक्तींना घरात सहज प्रवेश मिळत नाही. अशी मान्यता आहे.
उंबरठा घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्ती, नकारात्मक विचार आणि वाईट गोष्टींना घरात प्रवेश करण्यापासून रोखतो, असे मानले जाते.
उंबरठा घराला पाण्याच्या प्रवाहांपासून, कीटक आणि इतर घटकांपासून संरक्षण देतो. असे म्हंटले जाते.
पूर्वी उंबराच्या लाकडाचा उंबरठा बनवला जात असे, कारण ते पाण्यातही चांगला टिकातो. आजकाल सागवान किंवा इतर मजबूत लाकडाचा वापर केला जातो.
दाराला उंबरठा असणे हे केवळ एक वास्तुशास्त्रानुसार आवश्यक घटक नाही, तर ते घरासाठी आणि कुटुंबासाठी एक महत्वाचे संरक्षण देखील आहे. असे म्हंटले जाते.