पाणी पिणे बंद केले तर काय होईल ? माणूस पाण्याशिवाय किती दिवस जगू शकतो जाणून घ्या

Yashwant Kshirsagar

शरीरासाठी अत्यंत आवश्यक

आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. मानवी शरीराचा सुमारे ६० ते ७० टक्के भाग पाण्याने बनलेला असतो आणि शरीराच्या अनेक महत्त्वाच्या क्रिया त्यावर अवलंबून असतात.

Benefits of Drinking Water

|

esakal

महत्त्वाची भूमिका

पाणी केवळ तहानच भागवत नाही, तर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, पेशींना सक्रिय ठेवणे आणि जैविक प्रक्रिया योग्यरित्या पार पाडणे यांतही महत्त्वाची भूमिका बजावते.

Benefits of Drinking Water

|

esakal

दररोजची गरज

शरीराला दररोज पुरेसे पाणी मिळणे गरजेचे असते. साधारणपणे, पुरुषांना दिवसाला सुमारे ३.५ लिटर आणि महिलांना सुमारे २.५ लिटर पाण्याची आवश्यकता असते.

Benefits of Drinking Water

|

esakal

पाण्याशिवाय जगणे

पाण्याशिवाय माणूस किती काळ जगू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो.याचे कोणतेही निश्चित उत्तर नाही, कारण ते त्या व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असते.

Benefits of Drinking Water

|

esakal

किती काळ?

साधारणपणे असे मानले जाते की, एखादी व्यक्ती पाण्याशिवाय ३ ते ५ दिवस जगू शकते.

Benefits of Drinking Water

|

esakal

शरीर क्षमता

प्रचंड उष्णता किंवा अतिश्रम झाल्यास हा कालावधी कमी असू शकतो.

Benefits of Drinking Water

|

esakal

पाण्याची कमतरता

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास अशक्तपणा, चक्कर येणे आणि जुलाब यांसारखे त्रास होऊ शकतात.

Benefits of Drinking Water

|

esakal

अवयवांवर परिणाम

दीर्घकाळ पाणी न मिळाल्यास शरीरातील विविध अवयव योग्यरित्या काम करणे थांबवू शकतात.

Benefits of Drinking Water

|

esakal

दररोज एक टॉमेटो खाल्ला तर शरीरात काय बदल होतील?

Tomato Health Benefits

|

esakal

येथे क्लिक करा