सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी रोज २-३ लिटर पाणी प्यायले पाहिजे. ह्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
थंड पाण्याची पट्टी डोळ्यांवर ठेवली, तर डोळ्यांना ताजेतवाने वाटते आणि ताण कमी होतो.
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी रात्री ७-८ तास झोप घेणं आवश्यक आहे. रात्री जागरण टाळा.
गाजर, आंबा, पपई, रताळं, लाल भोपळा अशा ए जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहील.
पालेभाज्या, संत्री, लिंबू इत्यादी सी आणि ई जीवनसत्त्व असलेले पदार्थ खाल्ले तरी रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांचा मेकअप काढा. ह्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्यांमध्ये संक्रमण होण्याचा धोका कमी होतो.
उन्हाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर कमी करा. लेन्समुळे त्रास होत असल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
रात्री जागून मोबाईल फोन वापरणं टाळा. त्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा व ताण कमी होईल.