Anushka Tapshalkar
उत्तम आरोग्यासाठी रात्रीची झोप महत्त्वाची असते. मात्र कधी कधी ताण, चिंता व इतर कारणांमुळे रात्री झोप लागण्यात अडथळा येतो. अशावेळी घरातील काही अन्नपदार्थ फायदेशीर ठरतात.
Sleep
रात्री झोपण्यापूर्वी गरम हळदीचं दूध प्या. यात असलेलं ट्रायप्टोफॅन मेलाटोनिन नावाच्या झोपेच्या हार्मोनच्या निर्मितीत मदत करतं आणि हळदीचे सूज कमी करणारे गुणधर्म शरीराला विश्रांती देतात.
Haldi Milk
केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात, जे स्नायूंना विश्रांती देतात आणि मेंदूला शांत करतात. यात असलेले व्हिटॅमिन B6 ट्रायप्टोफॅनला मेलाटोनिनमध्ये बदलण्यास मदत करते.
Bananas
गरम जिरे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, पोट मोकळे होते आणि शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे गाढ झोप येते.
Cumin Water
sakal
पिस्त्यामध्ये नैसर्गिक मेलाटोनिन असते. रात्री थोडे पिस्ते खाल्ल्याने झोपेची वेळ आणि गुणवत्ता सुधारते. याशिवाय, यात मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 सुद्धा आहेत.
Pista
रात्री भिजवलेले बदाम खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. मॅग्नेशियममुळे निद्रानाश कमी होतो आणि रक्तातील साखर स्थिर राहण्यास मदत होते.
Almonds
sakal
केळ्याबरोबर सफरचंद किंवा चेरीसारखी फळं खाल्ल्याने शरीर नैसर्गिक विश्रांतीसाठी तयार होतं.
Mild Fruits
sakal
झोपण्याच्या आधी जड अन्न खाल्याने , त्याऐवजी हलके स्नॅक्स किंवा गरम हर्बल पेये घ्या. यामुळे पचन सोपे होते आणि झोप शांत होते.
Light Snack Before Bed
sakal
Do Not Drink Coffee With These Medications
sakal