Aarti Badade
शेवग्याची भाजी केवळ चविष्टच नाही, तर ती औषधी गुणांचा खजिना आहे. उन्हाळ्यात या भाजीचा समावेश आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
Moringa leaves benefits
Sakal
गावाकडे शेवग्याच्या पानांची भाजी आवडीने खाल्ली जाते. ज्वारीच्या भाकरीसोबत या भाजीची चव आणि सुगंध काही वेगळाच आणि मनाला तृप्त करणारा असतो.
Moringa leaves benefits
Sakal
शेवग्याची पाने तुम्ही मसूर डाळीत घालून, सूपमध्ये, स्मूदीमध्ये किंवा इतर पालेभाज्यांसोबत एकत्र करून बनवू शकता. याचे सेवन शरीराला थंडावा देते.
Moringa leaves benefits
Sakal
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी शेवग्याची पाने उत्तम आहेत. हे नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
Moringa leaves benefits
Sakal
जर तुम्हाला अनेक वर्षांपासून सांधेदुखी किंवा हाडांच्या कमकुवतपणाचा त्रास असेल, तर शेवग्याच्या पानांमधील कॅल्शिअम आणि फॉस्फरस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
Moringa leaves benefits
Sakal
शेवग्याच्या पानांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब (High BP) नियंत्रणात राहतो. तसेच, हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य जपते.
Moringa leaves benefits
sakal
शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात. संशोधनानुसार, नियमित सेवनाने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
Moringa leaves benefits
Sakal
ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणताही डाएट प्लॅन किंवा औषध उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
Moringa leaves benefits
Sakal
Brain tumor symptoms
Sakal