उन्हाळ्यात वजन कमी करायचय? मग, आहारात ‘या’ फळांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

बिघडलेली जीवनशैली

सध्याची बिघडलेली जीवनशैली, फास्टफूडचे वाढलेले सेवन, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

लठ्ठपणा

या सगळ्याचा परिणाम म्हणजे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढलेला लठ्ठपणा होय.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे डाएट प्लॅन्स आणि व्यायाम यांची मदत घेतली जाते. परंतु, याने तात्पुरता फरक पडतो.

तुम्ही आहारात हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करून आणि नियमितपणे व्यायाम करून वजन कमी करू शकता.

किवी

या फळाचे सेवन केल्याने शरीराची चयापचयाची क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

कलिंगड

कलिंगडामध्ये कॅलरीचे आणि साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी हे फळ अतिशय गुणकारी मानले जाते. 

संत्रा

संत्रामध्ये पोषकतत्वांचे मुबलक प्रमाण आढळून येते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले हे फळ उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. 

केसांमधील गुंता सोडवण्यासाठी सोप्या टिप्स करा फॉलो

Hair Care Tips | esakal