Aarti Badade
आयुर्वेदात आवळा म्हणजे औषधांचा राजा मानला जातो, आणि त्याच्या बियांमध्येही अप्रतिम आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत.आवळ्याच्या बिया विविध आरोग्य समस्यांसाठी उपयोगी पडतात.
आवळ्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सीडंट्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात, जे पचनसंस्थेला मदत करतात. ह्या बिया पचन प्रक्रियेला सुधारतात आणि पोटाच्या समस्यांपासून आराम देतात.
आवळ्याच्या बियांमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.हे फॅटी ऍसिड्स रक्तदाब कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल पातळी सुधारण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुदृढ करण्यास मदत करतात.
आवळ्याच्या बियांमधील पोषक तत्व शरीराच्या प्रतिकारशक्तीला बळकटी देतात. अँटीऑक्सीडंट्स आणि इतर खनिजे रोगांविरुद्ध शरीराला मजबूत बनवतात.
आवळ्याच्या बियांमधील पोषक तत्व त्वचेसाठी अनुकूल आहेत. त्वचेला तरतरी आणण्यासाठी मदत करतात.
आवळ्याच्या बियांमधील विशिष्ट पोषक तत्वे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. केसांचे पांढरेपण कमी करून, त्यांना मजबूत आणि हेल्दी बनवतात.
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास, मेटाबोलिजम सुधारण्यास आणि पचन क्रिया वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन कमी होण्याची प्रक्रिया सुलभ होते.