Anushka Tapshalkar
बीट हे एक कंदमूळ असून अनेक पौषातत्त्वांचे स्रोत आहे. त्यात फायबर, पोटॅशिअम, फोलेट आणि लोह भरपूर प्रमाणात असतात.
बीटरूट ज्यूसचे रोज सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
बीटरूट ज्यूसचे नियमित सेवन केल्याने ऑक्सिजन पुरवठा सुधारून सहनशक्ती वाढते.
बीटरूटमध्ये नायट्रेट मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्तदाब नियंत्रित राहतो.
बीटमधील बेटालाइन्स यकृत स्वच्छ ठेवून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात.
बीटरूटच्या ज्यूसमुळे मेंदूपर्यंत होणार रक्तप्रवाह वाढून लक्ष केंद्रीत करायला मदत होते.
बीटमध्ये असलेल्या फायबरमुळे चांगले पचन होऊन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
बीटमध्ये अँटिऑक्सिडंट्सही असतात. त्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
कमी कॅलरी आणि भरपूर पोषणमूल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
व्हिटॅमिन C आणि लोहामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे शरीरातील जळजळ कमी होते.
रक्तातील साखर स्थिर ठेवून इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.