Anushka Tapshalkar
दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबूपाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, जे शरीर, मन आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. चला जाणून घेऊया याचे ८ प्रमुख आरोग्यदायी फायदे.
लिंबामधील घटक यकृताच्या कार्यक्षमतेला चालना देतात आणि मूत्रमार्गाच्या आरोग्यास मदत करतात. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
लिंबूपाणी पचनासाठी आवश्यक असलेल्या एंझाइम्सचे स्रवण वाढवते आणि पित्तस्रावास चालना देते. यामुळे अन्न सहजपणे पचते आणि गॅसेस व फुगण्याची समस्या कमी होते.
कोमट पाण्याबरोबर लिंबू घेतल्यास शरीरातील चयापचय क्रिया अधिक कार्यक्षम होते. तसेच, लिंबामधील फायबर्स भूक कमी करतात आणि जास्त खाण्यापासून रोखतात.
रात्रभर झोपेच्या दरम्यान शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. सकाळी कोमट लिंबूपाणी घेतल्याने शरीर पुन्हा हायड्रेट होते आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखले जाते.
लिंबूमध्ये भरपूर व्हिटॅमिन C असल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे सर्दी, ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते.
लिंबूमध्ये असलेल्या व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील सूज कमी होते, मुरुमांवर नियंत्रण येते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. कोलेजन उत्पादनासही मदत होते, ज्यामुळे त्वचा टवटवीत आणि घट्ट राहते.
लिंबूच्या सुगंधामुळे मन प्रसन्न होते आणि जागरूकता वाढते. यासोबत हायड्रेशनमुळे थकवा कमी होतो आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने होते.er
लिंबू जरी आंबट चव असले, तरी शरीरात ते अल्कलाइन प्रभाव निर्माण करते. त्यामुळे अॅसिडिटी, अपचन आणि अॅसिड रिफ्लक्ससारख्या त्रासांपासून आराम मिळतो.