सकाळ डिजिटल टीम
भारतीय संघ १४ डिसेंबर पासून ब्रिस्बेनमध्ये गाबा कसोटी सामना खेळणार आहे.
२०२१ च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील गाबा कसोटीत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता.
अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने हा कसोटी सामना ३ विकेट्सने जिंकला आणि मालिका २-१ ने आपल्या नावे केली.
या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या, पण आता संघाबाहेर असणारे भारतीय खेळाडू कोण आहेत.
या मालिकेत टी नटराजनने कसोटी क्रकेटमध्ये पदार्पण केले होते आणि या मालिकेत त्याने प्रभावशाली कामगिरी केली होती. त्यानंतर तो भारतासाठी कसोटी सामना खेळलेला नाही.
सैनीने देखील या मालिकेत पदार्पण केले होते, त्यानंतर तो भारतीय कसोटी संघातून बाहेर राहिला आहे.
पुजाराने भारताच्या विजयात महत्तपुर्ण योगदान दिले होते. २०२३ WTC फायनल सामना पुजाराचा शेवटचा कसोटी सामना होता.
गाबा कसोटी खेळणाऱ्या मयंक अगरवाला देखील आता भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याने २०२२ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
गाबा कसोटीत ७ विकेट्स आणि ६९ धावांसह अष्टपैलू कामगिरी करणारा शार्दुल ठाकूर देखील यावेळी भारतीय संघाचा भाग नाही.
२०२१ मालिकेतील भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य राहाणेला यावेळीच्या BGT संघात स्थान मिळालेले नाही.