सकाळ डिजिटल टीम
अॅडिलेड मैदानावर भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतच्या दृष्टीने हा सामना व मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
जागतिक कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीत भारत पहिल्या स्थानी व ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला भारताने विजयी सुरूवात केली आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारताला उर्वरित ४ सामन्यांपैकी ५ सामने जिंकणे आवश्यक आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरलेला पाहायला मिळात आहे.
कारण १० वर्षांपूर्वी (२०१४ मध्ये) अॅडिलेड मैदानावर एक दुख:द घटना घडली होती.
शेफिल्ड शिल्ड सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्यूजचा डोक्याला चेंडू लागून मृत्यू झाला.
फिल ह्यूजला श्रद्धांजली म्हणून ऑस्ट्रेलियन संघ आज हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे.