सकाळ डिजिटल टीम
भारतीय संघ आज बांगलादेशविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना खेळत आहे.
प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने सामन्याला चांगली सुरूवात केली.
मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात विकेट घेत विकेट्सचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्याच षटकात हर्षित राणानेही विकेट घेतली.
सुरूवातील २ धावांवर दोन विकेट्स अशी बांगलादेशची अवस्था होती.
आठव्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेलला हॅटट्रिकची संधी होती.
त्याने दुसऱ्या चेंडूवर तन्झिद हसनला, तर तिसऱ्या चेंडूवर मुशफिकुर रहीमला बाद केले.
पण चौथ्या चेंडूवर जाकेर अलीचा स्लिपमध्ये उडालेला सोपा झेल रोहित शर्माने सोडला आणि अक्षरची हॅटट्रिक हुकली.
स्पिपमध्ये सोपा झेल सोडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.