Swadesh Ghanekar
अक्षर पटेलने नवव्या षटकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या तन्झींद हसन ( २५) व मुश्फिकर रहिम (०) यांना माघारी पाठवले.
अक्षरला हॅटट्रिकची संधी होती आणि जाकेर लीने स्लीपमध्ये हलवा झेलही दिला होता, पण रोहितने हलवा झेल सोडला
रोहितने झेल सोडल्याने अक्षर पटेलची नुसती हॅटट्रिक हुकली नाही, तर अनेक विक्रमांनाही त्याला मुकावे लागले.
रोहित स्वतःवर प्रचंड चिडला आणि त्याने जमिनीवर जोरजोरात हात मारला. त्यानंतर त्याने अक्षरची माफी मागितली.
झेल सुटला नसता तर, अक्षर आयसीसी वन डे स्पर्धांमध्ये पदार्पणात हॅटट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला असता
झेल सुटला नसता तर, अक्षर आयसीसी स्पर्धांमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज बनला असता
जेरोम टेलर हा सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीत हॅटट्रिक घेणारा एकमेव खेळाडू आहे त्याने २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता
कुलदीप यादव (ज्याने दोनदा हॅटट्रिक घेतली आहे) नंतर अक्षर हा वन डे हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज बनला असता.