सकाळ डिजिटल टीम
आज चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध पहिला सामना खेळणार आहे.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे.
आपण आजवर भारत बांगलादेशमधील वन-डे सामन्यांचा इतिहास पाहिला तर भारताचे नेहमीच बांगलादेशवर वर्चस्व राहिले आहे.
भारताने व बांगलादेशदरम्यान आजवर ४१ वन-डे सामने खेळवले गेले आहेत.
त्यापैकी ३२ सामने भारताने जिंकले आहेत.
तर अवघ्या ८ सामन्यांत बांगलादेशने विजय मिळवला आहे.
त्यापैकी एक सामना अनिर्णित राहिला आहे.
त्यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ आपले वर्चस्व कायम ठेवेल का आणि उंपात्यफेरीच्या दिशेने वाटचाल करेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.