सूरज यादव
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत दोन्ही संघाच्या फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी केलीय. भारताकडून १२ तर इंग्लंडच्या ७ फलंदाजांनी मिळून १९ शतकं केली आहेत.
भारताच्या एकट्या शुभमन गिलने ४ शतकं झळकावत ४०० धावांचा टप्पा गाठलाय. या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याच्या नावावर ७५४ धावा आहेत.
शुभमन गिलसह आणखी ४ फलंदाजांनी ४०० धावा केल्यात. भारताच्या ५ तर इंग्लंडच्या चौघांनी ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही संघातील ९ फलंदाजांनी एकाच मालिकेत ४०० पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिली वेळ आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये शुभमन गिलनंतर केएल राहुल, रविंद्र जडेजा, ऋषभ पंत यांचा नंबर लागतो. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा फलंदाज आहे.
याआधी १९७५-७६ मध्ये ८ फलंदाजांनी ४०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तेव्हा वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता.
१९९३ मध्येही ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतही ८ फलंदाजांनी ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला होता.