Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अँडरसन तेंडुलकर ट्ऱॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली.
या ५ सामन्यांच्या मालिकेत भारताचा कर्णधार शुभमन गिलने दमदार कामगिरी केली.
शुभमन गिलने या मालिकेत ५ सामन्यातील १० डावात ४ शतकांसह ७५४ धावा ठोकल्या.
त्यामुळे गिल आता एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर भारतीय खेळाडू बनला आहे.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आणि तिसऱ्या क्रमांकावर सुनील गावसकर आहेत.
गावसकरांनी १९७१ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यात ४ सामन्यांतील ८ डावात ४ शतके आणि ३ अर्धशतकांसह तब्बल ७७४ धावा ठोकल्या होत्या.
त्यानंतर गावसकरांनी १९७८-७९ दरम्यान भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ६ सामन्यांतील ९ डावात ४ शतके आणि १ अर्धशतकांसह ७३२ धावा केल्या होत्या.
या यादीत चौथ्या क्रमांकावर यशस्वी जैस्वाल असून त्याने २०२४ मध्ये भारतात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५ सामन्यांती ९ डावात २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ७१२ धावा केल्या होत्या.
पाचव्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४ सामन्यांतील ८ डावात ४ शतके आणि १ अर्धशतकांसह ६९२ धावा ठोकल्या होत्या.