सकाळ डिजिटल टीम
भारतीय संघ उद्या न्यूझीलंडविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना खेळणार आहे.
यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीतील बक्षिसांवर आयसीसीने एकूण ६०.६ कोटी रूपये खर्च केले आहेत. जे २०१७ च्या तुलनेत ५३% जास्त आहेत.
स्पर्धेत सामील झालेल्या संघांना प्रत्येकी १ कोटी रूपये मिळणार आहेत.
ग्रुप स्टेजमधील सामना विजेत्यांना २.९५ कोटी रूपये मिळणार आहेत.
म्हणजेच भारताला ३ सामन्यांचे एकूण ८८ लाख व न्यूझीलंडला २ विजयांचे ५९ लाख रूपये मिळतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेत्याला एकूण १९.४९ कोटी रूपये व उपविजेत्याला ९.७४ कोटी रूपये मिळणार आहे.
जर भारतीय संघ विजेता झाल्यास टीम इंडियाला स्पर्धेमधून एकूण (१९.४९ कोटी + ८८ लाख + १ कोटी =२१.३७ कोटी ) रूपये मिळतील व पराभूत झाल्यास (९.७४ कोटी + ८८ लाख + १ कोटी = ११.६२ कोटी) रूपये मिळतील.
न्यूझीलंड संघ विजेता झाल्यास त्यांना एकूण ( १९.४९ कोटी + ५९ लाख + १ कोटी = २१.०८ कोटी) रूपये मिळतील आणि उपविजेता ठरल्यास (९.७४ कोटी + ५९ लाख + १ कोटी = ११.३३ कोटी) रूपये मिळतील.