Swadesh Ghanekar
भारतीय संघ ९ मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला भिडणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध अनेक भारतीय फलंदाजांनी वन डे क्रिकेटमध्ये १००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच भारतीय फलंदाजांपैकी चौघांनी निवृत्ती घेतली आहे.
सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक १७५० धावा केल्या आहेत.त्यात ५ शतकं आणि ८ अर्धशतकं आहेत.
विराट कोहली १६५६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याच्या नावावर ६ शतके आणि ९ अर्धशतके आहेत.
माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ११५७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत.
माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने १११८ धावांसह चौथे स्थान टिकवले आहे. त्याला एकच शतक झळकावता आले आहे.
माजी कर्णधार सौरव गांगुली पाचव्या क्रमांकावर आहे आणि त्याने ३ शतकं व ६ अर्धशतकांसह १०७९ धावा केल्या आहेत.