सकाळ डिजिटल टीम
भारतीय संघ आज पाकिस्तानविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसरा सामना खेळणार आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत.
भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.
या सामन्यासाठी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
भारतीय चाहत्यांनी संघाच्या विजासाठी पुजा, प्रार्थना सुरू केली आहे.
तर सोशल मीडियावर या रायव्हरली संदर्भात अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.
दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताचे पाकिस्तानवर वर्चस्व राहिले आहे.
हा सामना जिंकून स्पर्धेत उपांत्यफेरी गाठण्याची भारतीय संघाकडे संधी आहे.